सीमा सुरक्षा दल अंतर्गत १५२६ नवीन पदांसाठी भरती जाहीर

Border Security Force Recruitment 2024

Border Security Force Recruitment 2024 :- सीमा सुरक्षा दल अंतर्गत १५२६ नवीन पदांची मोठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत “सहाय्यक उपनिरीक्षक (स्टेनोग्राफर / लढाऊ स्टेनोग्राफर) आणि वॉरंट ऑफिसर (वैयक्तिक सहाय्यक), हेड कॉंस्टेबल (मंत्रालय / लढाऊ मंत्री) आणि हवालदार (लिपिक)” या पदासाठी भरती जाहीर झालेली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवावे. ह्या भरतीसाठी अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख ही ०८ जुलै २०२४ ही असून संबंधित अर्ज ०९ जून २०२४ पासून खाली नमूद केलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील. तसेच संबंधित भरतीसाठी लागणारी उमेदवाराची संपूर्ण माहिती, शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा हयाबद्दलचे सर्व मुद्दे कळविण्यात आले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधित जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचावी. तसेच ह्या भरतीबाबत पुढील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी Kamdhande.Com ह्या संकेतस्थळाला भेट द्या.

एकूण पदांची संख्या :- १५२६ पदे

पदाचे नाव :- सहाय्यक उपनिरीक्षक (स्टेनोग्राफर / लढाऊ स्टेनोग्राफर) आणि वॉरंट ऑफिसर (वैयक्तिक सहाय्यक), हेड कॉंस्टेबल (मंत्रालय / लढाऊ मंत्री) आणि हवालदार (लिपिक)

शैक्षणिक पात्रता :- १२ वी उत्तीर्ण

वेतनमान :-

१) सहाय्यक उपनिरीक्षक (स्टेनोग्राफर / लढाऊ स्टेनोग्राफर) आणि वॉरंट ऑफिसर (वैयक्तिक सहाय्यक) :- रुपये २९,२००/- ते रुपये ९२,३००/-

२) हेड कॉंस्टेबल (मंत्रालय / लढाऊ मंत्री) आणि हवालदार (लिपिक) :- रुपये २५,५००/- ते रुपये ८१,१००/-

वयोमर्यादा :- किमान १८ वर्षे ते कमाल २५ वर्षे

अनुप्रयोग मोड :- ऑनलाइन

प्रवेश शुल्क :-

१) इतर उमेदवारांसाठी :- रुपये १००/-

२) SC/ ST/PwBD/ माजी सैनिक/ महिला :- प्रवेश शुल्क आकरले जाणार नाही.

प्रवेश अर्ज सुरू होण्याची तारीख :- ०९ जून २०२४

प्रवेश अर्ज करण्याची अंतिम तारीख :- ०८ जुलै २०२४

Border Security Force Recruitment 2024 :-
Border Security Force (BSF) offically announced 1526 vacant post. Recruitment of "Assistant Sub Inspector (Stenographer/ Combatant Stenographer) and Warrant Officer (Personal Assistant), Head Constable (Ministerial/ Combatant Ministerial and Havildar (Clerk)" posts under Border Security Force (BSF). The last date of submission of application is 08th July 2024. Mode of Application is Online. Also the recruitment application form will be available from 09th June 2024 on given website. The application fees for all candidates is Rs. 100/- and no application fees charged for SC/ ST/ PwBD/ Ex-Serviceman/ Women candidates. The age limit for those posts is 18 to 25 years old. The information regarding how to apply as well as educational qualification, selection process, important documents are given below. The complete details of recruitment are given in the advertisement. Before applying for this recruitment read the advertisement carefully. For more information please visit our website Kamdhande.Com.

Border Security Force Recruitment 2024 :- उमेदवाराची पात्रता

  • SC / ST उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०५ वर्षे अधिक असेल.
  • OBC/ माजी सैनिक साठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०३ वर्षे अधिक असेल.
  • विधवा तसेच घटस्पोटीत महिलांसाठी वयोमर्यादा ही कमाल ३५ वर्षे इतकी असेल.

Border Security Force Recruitment 2024 :- संबंधित भरतीसाठी प्रवेश अर्ज कसा करावा ?

  • उमेदवाराने संबंधित भरतीची खाली नमूद केलेली जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावी.
  • उमेदवाराने संबंधित भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, महत्वाची कागदपत्रे इत्यादी बाबींची खात्री करूनच व्यवस्थित अर्ज भरावा.
  • प्रवेश अर्ज भरताना उमेदवाराने स्वतःचा चालू असलेला ईमेल आयडी तसेच मोबाइल नंबर प्रविष्ट करावा जेणेकरून भरतीबाबतचे पुढील सूचना मिळण्यास मदत होईल.
  • प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावा आणि मग त्यानंतर अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
  • प्रवेश अर्जासोबत उमेदवाराने त्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
  • प्रवेश अर्ज भरून झाल्यावर संबंधित भरतीसाठी लागणारे प्रवेश शुल्क भरणे उमेदवारासाठी बंधनकारक असेल.
  • अंतिम सबमिशन करण्यापूर्वी उमेदवाराने संपूर्ण प्रवेश अर्ज काळजीपूर्वक पडताळून घ्यावा.

Border Security Force Recruitment 2024 :- प्रवेशप्रक्रिया

  • उमेदवाराने सीमा सुरक्षा दलच्या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज भरणे. पुढील तीन टप्प्यांमध्ये अर्ज करावा.

१) एक वेळ नोंदणी (One Time Registration) OTR :- एक वेळ नोंदणीमध्ये नाव, मोबाईल नंबर आणि ईमेल प्रविष्ट केल्यानंतर नोंदणी आयडी आणि पासवर्ड मिळेल तो पुढील बाबींसाठी जपून ठेवावा.

२) ऑनलाइन अर्ज भरणे (Filling of Online Application) :- नोंदणीचा भाग पूर्ण झाल्यावर ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात करावी. ऑनलाइन अर्ज करताना उमेदवाराची संपूर्ण माहिती, फोटो, सही, कागदपत्र आणि अंगठ्याच्या ठसा हे jpg, jpeg, png फॉरमॅट मध्ये जोडणे आवश्यक आहे.

३) डिजिटल पद्धतीने परीक्षा शुल्क भरणे (Payment of examination fee through prescribed digital mode) :- नेट बँकिंग/ डेबिट कार्ड/ क्रेडिट कार्ड ह्यापैकी कुठल्याही एका पद्धतीने परीक्षा शुल्क भरता येईल.

Border Security Force Recruitment 2024 :- इतर महत्वाच्या सूचना

  • संबंधित भरतीसंबंधित सर्व अधिकार हे सीमा सुरक्षा दलाकडे राखीव असतील.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे भारताचे नागरिकत्व असणे आवश्यक आहे.
  • भरतीसंबंधित कोणत्याही नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज नाकारण्यात येईल.
  • प्रवेश अर्जामध्ये कोणत्याही बाबींची त्रुटि आढळल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • संबंधित भरतीसंबंधित एकदा भरलेल्या अर्जामध्ये कोणत्याही प्रकारचे फेरबदल हे उमेदवारास करता येणार नाही.
  • एकदा भरलेले प्रवेश शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही.
  • संगणकावर आधारित परीक्षा ही केवळ हिन्दी आणि इंग्रजी भाषेत असेल.
  • कौशल्य चाचणी ही केवळ हिन्दी आणि इंग्रजी भाषेत असेल.
  • ई प्रवेशपत्र उमेदवाराने नमूद केलेल्या ईमेल आयडीवर पाठवण्यात येईल. परीक्षेला जाण्यापूर्वी त्या ई प्रवेशपत्राच्या दोन रंगीत प्रती घेऊन जाणे उमेदवारास बंधनकारक असेल.
  • उमेदवाराने प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्या अर्जाची एक प्रत काढून ठेवावी.
  • कागदपत्र पडताळणी ही ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.
  • कागदपत्र पडताळणीसाठी मूळ कागदपत्रे तसेच त्याच्या प्रती घेऊन जाणे आवश्यक आहे.
  • अधिक माहितीसाठी खाली दिलेले PDF डाऊनलोड करा.

Border Security Force Recruitment 2024 :- प्रवेश अर्जासोबत आवश्यक असणारी महत्वाची कागदपत्रे

  • उमेदवाराचा सध्याचा पासपोर्ट साइज फोटो (३० KB ते १०० KB)
  • उमेदवाराची सही (२० KB ते ५० KB)
  • उमेदवारच्या अंगठ्याचा शिक्का (५० KB पेक्षा जास्त नसावा)
  • उमेदवाराचे ओळखपत्र :- आधार कार्ड / मतदान ओळखपत्र / पॅनकार्ड / पासपोर्ट / ड्रायविंग लायसेंस इत्यादी (३० KB ते १०० KB)
  • मॅट्रिक प्रमाणपत्र (३० KB ते १०० KB)
  • १० + २ उत्तीर्ण प्रमाणपत्र (३० KB ते १०० KB)
  • जातीचा दाखला (३० KB ते १०० KB)
  • माजी सैनिक :- डिस्चार्ज प्रमाणपत्र ; NOC (३० KB ते १०० KB)
  • महिला उमेदवार :- विवाह प्रमाणपत्र (३० KB ते १०० KB)
  • पुनविवाहित महिला उमेदवार :- घटस्फोट दाखला/ पहिल्या नवऱ्याचे मृत्यू प्रमाणपत्र (३० KB ते १०० KB)
  • घटस्फोटित महिला उमेदवार :- घटस्फोट दाखला (३० KB ते १०० KB)

Border Security Force Recruitment 2024 :- परीक्षेचे स्वरूप आणि सविस्तर माहिती

परीक्षा पुढीलप्रमाणे तीन टप्प्यांमध्ये घेण्यात येईल:-

  • पहिला टप्पा :- शारिरीक मानक चाचणी (PST) आणि शारिरीक कार्यक्षमता चाचणी (PET)
  • दुसरा टप्पा :- संगणक आधारित चाचणी (CBT)
  • तिसरा टप्पा :- कौशल्य चाचणी, कागदपत्रांची पडताळणी, वैद्यकीय तपासणी

१) शारिरीक कार्यक्षमता चाचणी (PET) :-

  • पुरुष उमेदवार :- १.६ किमीची शर्यत ०६ मिनिटे ३० सेकंदात
  • महिला उमेदवार :- ८०० मीटरची शर्यत ०४ मिनिटे ४५ सेकंदात

२) संगणक आधारित चाचणी (CBT) :-

  • विषय :- हिन्दी / इंग्लिश ; सामान्य बुद्धिमत्ता ; संख्यात्मक योग्यता ; कारकुनी योग्यता ; संगणक ज्ञान
  • प्रश्नांची संख्या :- २० प्रश्न प्रत्येकी विषय
  • जास्तीत जास्त गुण :- २० गुण प्रत्येकी विषय
  • वेळ :- ०१ तास ४० मिनिटे
  • एकूण गुण :- १०० गुण
  • प्रश्नपत्रिका फक्त हिन्दी आणि इंग्लिश मध्ये सेट केली जाईल.
  • CBT मध्ये प्रश्न मध्यवर्ती स्तराचा असेल.
  • परीक्षेचे ठिकाण आणि तारीख ही एसएमएस किंवा ईमेल द्वारा पाठवलेल्या ई प्रवेशपत्राद्वारे कळवण्यात येईल.
  • उमेदवारांना कॅक्ल्युलेटर आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरण्याची परवानगी नाही.
  • गुणांचे पुनर्मुल्यांकन किंवा पुनः तपासणी करण्याची कोणतीही तरतूद नाही.

3) कौशल्य चाचणी :-

  • सहाय्यक उपनिरीक्षक : शब्दलेखन- १० मिनिटे@ ८० शब्द प्रती मिनिट ; प्रतिलेखन वेळ : इंग्लिशमध्ये ५० मिनिटे आणि हिन्दीमध्ये ६५ मिनिटे (संगणकावर).
  • हेड कॉंस्टेबल :- इंग्लिश टायपींग गती कमीत कमी ३५ शब्द प्रती मिनिट किंवा हिन्दी टायपींग गती कमीत कमी ३० शब्द प्रती मिनिट (संगणकावर).
  • हिन्दी कौशल्य चाचणी फक्त मंगल फॉन्ट मध्येच घेतली जाईल.
  • कौशल्य चाचणीच्या पुनः परीक्षेची कोणतीही विनंती स्वीकारली जाणार नाही.

OFFICIAL WEBSITE CLICK HERE
APPLY ONLINECLICK HERE
NOTIFICATION PDF CLICK HERE

नवनवीन भरतीशी संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा. तसेच या वेबसाइट मार्फत मिळणाऱ्या सर्व भरतींचे अपडेट्स तुमच्या मित्रांसोबत तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच येणाऱ्या इतर नवनवीन भरतींचे विनामूल्य अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Kamdhande.Com या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा.