Chandrapur DCC Bank Recruitment 2024
Chandrapur DCC Bank Recruitment 2024 :- चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ३५८ जागांसाठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत “लिपीक आणि शिपाई” या पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवावे. ह्या भरतीसाठी अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख ही १९ ऑक्टोबर २०२४ २२ ऑक्टोबर २०२४ पर्यंत असून संबंधित अर्ज ०८ ऑक्टोबर २०२४ पासून खाली नमूद केलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील.. तसेच संबंधित भरतीसाठी लागणारी उमेदवाराची संपूर्ण माहिती, शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा हयाबद्दलचे सर्व मुद्दे कळविण्यात आले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधित जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचावी. तसेच ह्या भरतीबाबत पुढील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी Kamdhande.Com ह्या संकेतस्थळाला भेट द्या.
एकूण पदांची संख्या :- ३५८ पदे
पदाचे नाव :-
१) लिपीक
२) शिपाई
शैक्षणिक पात्रता :-
१) लिपीक :- कोणत्याही शाखेचा पदवीधर (मान्यताप्राप्त विद्यापीठ) आणि MSCIT किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण. वाणिज्य शाखेचा पदवीधर / पदव्युत्तर पदवी व बँकिंग क्षेत्रातील लिपिक / वरिष्ठ श्रेणीतील कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव असल्यास प्राधान्य. त्याचप्रमाणे इंग्रजी / मराठी टंकलेखन / लघुलेखनाची परीक्षा उत्तीर्ण असल्यास प्राधान्य.
२) शिपाई :- किमान इयत्ता १० वी परीक्षा उत्तीर्ण.
वयोमर्यादा :-
१) लिपीक :- कमीत कमी २१ वर्षे ते जास्तीत जास्त ३८ वर्षे
२) शिपाई :- कमीत कमी १८ वर्षे ते जास्तीत जास्त ३८ वर्षे
अनुप्रयोग मोड :- ऑनलाइन
प्रवेश शुल्क :- रुपये ५६०/-
प्रवेश अर्ज सुरू होण्याची तारीख :- ०८ ऑक्टोबर २०२४
प्रवेश अर्ज करण्याची अंतिम तारीख :- १९ ऑक्टोबर २०२४ २२ ऑक्टोबर २०२४
Chandrapur DCC Bank Recruitment 2024 :- संबंधित भरतीसाठी प्रवेश अर्ज कसा करावा ?
- उमेदवाराने संबंधित भरतीची खाली नमूद केलेली जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावी.
- उमेदवाराने संबंधित भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, महत्वाची कागदपत्रे इत्यादी बाबींची खात्री करूनच व्यवस्थित अर्ज भरावा.
- प्रवेश अर्ज भरताना उमेदवाराने स्वतःचा चालू असलेला ईमेल आयडी तसेच मोबाइल नंबर प्रविष्ट करावा जेणेकरून भरतीबाबतचे पुढील सूचना मिळण्यास मदत होईल.
- प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावा आणि मग त्यानंतर अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
- प्रवेश अर्जासोबत उमेदवाराने त्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
- प्रवेश अर्ज भरून झाल्यावर संबंधित भरतीसाठी लागणारे प्रवेश शुल्क भरणे उमेदवारासाठी बंधनकारक असेल.
- अंतिम सबमिशन करण्यापूर्वी उमेदवाराने संपूर्ण प्रवेश अर्ज काळजीपूर्वक पडताळून घ्यावा.
Chandrapur DCC Bank Recruitment 2024 :- इतर महत्वाच्या सूचना
- संबंधित भरतीसंबंधित सर्व अधिकार हे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे राखीव असतील.
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे भारताचे नागरिकत्व असणे आवश्यक आहे.
- भरतीसंबंधित कोणत्याही नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज नाकारण्यात येईल.
- प्रवेश अर्जामध्ये कोणत्याही बाबींची त्रुटि आढळल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- संबंधित भरतीसंबंधित एकदा भरलेल्या अर्जामध्ये कोणत्याही प्रकारचे फेरबदल हे उमेदवारास करता येणार नाही.
- एकदा भरलेले प्रवेश शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही.
- उमेदवाराने प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्या अर्जाची एक प्रत काढून ठेवावी.
- कागदपत्र पडताळणी ही ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.
- कागदपत्र पडताळणीसाठी मूळ कागदपत्रे तसेच त्याच्या प्रती घेऊन जाणे आवश्यक आहे.
- उमेदवाराने भरती प्रक्रियेत कोणत्याही पदाधिकारी / अधिकारी यांचेकडून शिफारस / दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास कोणत्याही टप्प्यावर उमेदवारास अपात्र घोषित करून निवड प्रक्रियेतून बाद केले जाईल.
- यापूर्वी बँकेकडे याच पदासाठी प्रत्यक्ष कागदोपत्री किंवा मेलद्वारे अर्ज केले असतील तर त्यांचे पूर्वीचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही. त्यांना नव्याने ऑनलाइन पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज सादर करणे आवश्यक राहील.
- उमेदवाराने भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वेळोवेळी संकेत स्थळावर सूचना पाहव्यात. संकेत स्थळावरील सूचना पाहिल्या नाहीत यास्तव आलेल्या कोणत्याही तक्रारीची दखल घेतली जाणार नाही. या भरती प्रक्रिया अनुषंगाने कोणत्याही उमेदवाराशी स्वतंत्र पत्र व्यवहार केला जाणार नाही.
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरते वेळी उमेदवारांना कागदपत्रे सादर करावयाची नसली तरी ज्या उमेदवारांकडे आवश्यक शैक्षणिक अर्हता असेल त्यांनीच उमेदवारी अर्ज दाखल करावा.
- कागदपत्रे पडताळणी मध्ये मुलाखतीस पात्र होणाऱ्या उमेदवारांची बँकेने गठीत केलेल्या समितीकडून मुलाखत घेण्यात येईल. मुलाखत १० गुणांची असेल. उमेदवार मुलाखतीस गैरहजर असल्यास तो अंतिम निवडीस पात्र राहणार नाही. लिपीक पदाची मुलाखत १० गुणांची असून सदर गुणांचे भारांकन नमूद केलेले आहे. त्यामध्ये १० पैकी ०५ गुण मौखिक मुलाखतीसाठी देण्यात येतील तसेच उर्वरित ०५ गुण संबंधित उमेदवारांच्या पुढील शैक्षणिक पात्रतेनुसार देण्यात येतील. (वाणिज्य / बँकिंग, कृषी व कृषी संलग्न, अभियांत्रिकी, संगणक, विधी, शास्त्र, व्यवस्थापन, या शाखेतील पदवीधर असल्यास ०१ गुण + JAIIB / CAIIB असल्यास ०१ गुण + Tally / Advanced Tally असल्यास ०१ गुण + राष्ट्रीयकृत / खाजगी / व्यापारी / सहकारी बँकेतील कामकाजाबाबत किमान ०३ वर्षांचा अनुभव असल्यास ०१ गुण + प्रकल्पग्रस्त दाखला असल्यास ०१ गुण)
- निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना ०१ वर्षासाठी परिविक्षाधीन (प्रोबेशनरी) सेवेत नेमणूक दिली जाईल.
- अंतिम निवड झालेल्या उमेदवारास बँकेमध्ये किमान ०३ वर्षे सेवा करणेबाबत कारारपत्र / हमीपत्र करून द्यावे लागेल.
- नैसर्गिक आपत्तीमुळे अगर अन्य कारणामुळे विहित दिनांकास ऑनलाइन परीक्षा घेणे शक्य नसेल तर अन्य सोयीच्या दिवशी ऑनलाइन परीक्षा घेण्यात येईल.
- अधिक माहितीसाठी खाली दिलेले PDF डाऊनलोड करा.
Chandrapur DCC Bank Recruitment 2024 :- प्रवेश अर्जासोबत आवश्यक असणारी महत्वाची कागदपत्रे
- उमेदवाराचा सध्याचा पासपोर्ट साइज फोटो (JPG / PNG – ०२ MB)
- उमेदवाराची सही (JPG / PNG – ०२ MB)
- आधार कार्ड (JPG / PDF / PNG – ०२ MB)
- शैक्षणिक अहर्तेचा पुरावा – लिपीक यांचेकरीता पदवी प्रमाणपत्र / शिपाई यांचेकरीता इयत्ता १० वी प्रमाणपत्र
- जन्म दिनांकाचा पुरावा – इयत्ता १० वी प्रमाणपत्र
- MSCIT अथवा समकक्ष प्रमाणपत्र (लिपीक पदासाठी)
- टंकलेखन प्रमाणपत्र (असल्यास)
- लघुलेखन प्रमाणपत्र (असल्यास)
- अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)
- उमेदवाराने अर्जात उल्लेख केलेली सर्व प्रमाणपत्रे
- विवाहित महिलांच्या नावात बदल झाल्यास पुरावा – महाराष्ट्र शासन राजपत्र
- जिल्हा पुर्नवसन अधिकारी यांचा प्रकल्पग्रस्त दाखला (असल्यास)
OFFICIAL WEBSITE | CLICK HERE |
APPLY ONLINE | CLICK HERE |
NOTIFICATION PDF | CLICK HERE |
Chandrapur DCC Bank Recruitment 2024 :-
Chandrapur District Central Co-Operative Bank Limited offically announced 358 vacant post. Recruitment of "Clerk and Peon" posts under Chandrapur District Central Co-Operative Bank Limited. The last date of submission of application is19th October 202422nd October 2024. Mode of Application is Online. Also the recruitment application form will be available from 08th October 2024 on given website. The information regarding how to apply as well as educational qualification, selection process, important documents are given below. The complete details of recruitment are given in the advertisement. Before applying for this recruitment read the advertisement carefully. For more information please visit our website Kamdhande.Com.
Total Number of posts :- 358 posts
Name of the Post :-
1) Clerk
2) Peon
Education Qualifications :-
1) Clerk :- Graduate in any discipline (Recognized University) and Passed MSCIT or equivalent examination. Bachelor's / Master's Degree in Commerce and experience in Clerical / Senior Category in Banking Sector preferred. Similarly, Passing English / Marathi Typing / Shorthand test will be preferred.
2) Peon :- Minimum Passed Class 10th Examination.
Age Limit :-
1) Clerk :- Minimum 21 years to Maximum 38 years
2) Peon :- Minimum 18 years to Maximum 38 years
Application Mode :- Online
Application Fees :- Rs. 560/-
First date of submission of application :- 08th October 2024
Last date of submission of application :-19th October 202422nd October 2024
Important Documents :-
1) Candidate's passport size photo (JPG / PNG - 02 MB)
2) Candidate's signature (JPG / PNG - 02 MB)
3) Aadhar Card (JPG / PNG / PDF - 02 MB)
4) Proof of Educational Qualification - Graduation Certificate for Clerk / Class 10th Certificate for Peon
5) Proof of Date Of Birth - Class 10th Certificate
6) MSCIT or equivalent certificate (For Clerical Post)
7) Typing Certificate (if any)
8) Shorthand Certificate (if any)
9) Experience Certificate (if any)
10) All Certificates mentioned by the candidate in the application
11) Proof in case of change of name of married women - Maharashtra Government Gazette
12) Project Affected Certificate from the District Rehabilitation Officer (if any)
नवनवीन भरतीशी संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा. तसेच या वेबसाइट मार्फत मिळणाऱ्या सर्व भरतींचे अपडेट्स तुमच्या मित्रांसोबत तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच येणाऱ्या इतर नवनवीन भरतींचे विनामूल्य अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Kamdhande.Com या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा.