कोचीन शिपयार्ड लिमिटेड (CSL) अंतर्गत नवीन पदांसाठी भरती जाहीर

Cochin Shipyard Limited Bharti 2024

Cochin Shipyard Limited Bharti 2024 :- कोचीन शिपयार्ड लिमिटेड (CSL) अंतर्गत २० नवीन पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत “सहाय्यक अभियंता (यांत्रिक), सहाय्यक अभियंता (विद्युत), सहाय्यक अभियंता (इलेक्ट्रॉनिक्स), सहाय्यक अभियंता (देखभाल), सहाय्यक प्रशासकीय अधिकारी, सहाय्यक अग्निशमन अधिकारी, लेखापाल” या पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवावे. ह्या भरतीसाठी अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख ही ३० ऑक्टोबर २०२४ पर्यंत असून संबंधित अर्ज ०४ ऑक्टोबर २०२४ पासून खाली नमूद केलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील.. तसेच संबंधित भरतीसाठी लागणारी उमेदवाराची संपूर्ण माहिती, शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा हयाबद्दलचे सर्व मुद्दे कळविण्यात आले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधित जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचावी. तसेच ह्या भरतीबाबत पुढील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी Kamdhande.Com ह्या संकेतस्थळाला भेट द्या.

एकूण पदांची संख्या :- २० पदे

पदाचे नाव :-

१) सहाय्यक अभियंता (यांत्रिक)

२) सहाय्यक अभियंता (विद्युत)

३) सहाय्यक अभियंता (इलेक्ट्रॉनिक्स)

४) सहाय्यक अभियंता (देखभाल)

५) सहाय्यक प्रशासकीय अधिकारी

६) सहाय्यक अग्निशमन अधिकारी

७) लेखापाल

शैक्षणिक पात्रता :-

१) सहाय्यक अभियंता (यांत्रिक) :- राज्य तंत्र शिक्षण मंडळामधून यांत्रिक अभियांत्रिकीतील ०३ वर्षांचा डिप्लोमा. शिपयार्ड, डॉकयार्ड, अभियांत्रिकी कंपनी किंवा शासकीय संस्थेत यांत्रिक कामांचा ०७ वर्षांचा अनुभव, ज्यामध्ये ०२ वर्षांचा अनुभव यांत्रिक कामे आणि कामगारांच्या देखरेखित असावा.

२) सहाय्यक अभियंता (विद्युत) :- राज्य तंत्र शिक्षण मंडळामधून विद्युत अभियांत्रिकीतील ०३ वर्षांचा डिप्लोमा. शिपयार्ड, डॉकयार्ड, अभियांत्रिकी कंपनी किंवा शासकीय संस्थेत विद्युत कामांचा ०७ वर्षांचा अनुभव, ज्यामध्ये ०२ वर्षांचा अनुभव विद्युत कामे आणि कामगारांच्या देखरेखित असावा किंवा इलेक्ट्रिशियन ह्या व्यवसायातील ITI (NTC) प्रमाणपत्र आणि नॅशनल अप्रेंटिस सर्टिफिकेट (NAC) आणि शिपयार्ड, डॉकयार्ड, अभियांत्रिकी कंपनी किंवा शासकीय संस्थेत विद्युत कामांचा २२ वर्षांचा अनुभव

३) सहाय्यक अभियंता (इलेक्ट्रॉनिक्स) :- राज्य तंत्र शिक्षण मंडळामधून इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी / इलेक्ट्रॉनिक्स आणि संप्रेषण अभियांत्रिकीतील ०३ वर्षांचा डिप्लोमा. शिपयार्ड, डॉकयार्ड, अभियांत्रिकी कंपनी किंवा शासकीय संस्थेत इलेक्ट्रॉनिक्स कामांचा ०७ वर्षांचा अनुभव, ज्यामध्ये ०२ वर्षांचा अनुभव इलेक्ट्रॉनिक्स कामे आणि कामगारांच्या देखरेखित असावा किंवा इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक ह्या व्यवसायातील ITI (NTC) प्रमाणपत्र आणि नॅशनल अप्रेंटिस सर्टिफिकेट (NAC) आणि शिपयार्ड, डॉकयार्ड, अभियांत्रिकी कंपनी किंवा शासकीय संस्थेत इलेक्ट्रॉनिक्स कामांचा २२ वर्षांचा अनुभव

४) सहाय्यक अभियंता (देखभाल) :- राज्य तंत्र शिक्षण मंडळामधून यांत्रिक अभियांत्रिकीतील ०३ वर्षांचा डिप्लोमा. शिपयार्ड, डॉकयार्ड, अभियांत्रिकी कंपनी किंवा शासकीय संस्थेत यंत्रणा / क्रेन देखभालीच्या कामांचा ०७ वर्षांचा अनुभव, ज्यामध्ये ०२ वर्षांचा अनुभव देखभालीची कामे आणि कामगारांच्या देखरेखित असावा किंवा मेकॅनिक मोटर व्हेईकल / फिटर व्यवसायातील ITI (NTC) प्रमाणपत्र आणि नॅशनल अप्रेंटिस सर्टिफिकेट (NAC) आणि शिपयार्ड, डॉकयार्ड, अभियांत्रिकी कंपनी किंवा शासकीय संस्थेत यंत्रणा / क्रेन देखभालीच्या कामांचा २२ वर्षांचा अनुभव

५) सहाय्यक प्रशासकीय अधिकारी :- मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ६०% गुणांसह ०३ वर्षांची पदवी (कला पदवी, विज्ञान पदवी, व्यवसाय व्यवस्थापन पदवी, संगणक अनुप्रयोग पदवी, वाणिज्य पदवी) किंवा राज्य तंत्र शिक्षण मंडळामधून किमान ६०% गुणांसह कमर्शियल प्रॅक्टिस / संगणक अभियांत्रिकी / माहिती तंत्रज्ञानामध्ये किमान ०३ वर्षांचा डिप्लोमा. SAP, MS Project, MS Office मध्ये प्राविण्य तसेच किमान ०७ वर्षांचा अनुभव

६) सहाय्यक अग्निशमन अधिकारी :- SSLC उत्तीर्ण आणि नॅशनल फायर सर्विस कॉलेज, नागपूर किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण तसेच शिपयार्डमध्ये उपअधिकारी अभ्यासक्रम आणि अग्निशामक व संबंधित ऑपरेशन्समध्ये ०७ वर्षांचा अनुभव

७) लेखापाल :- M.Com. मध्ये पदवीधर आणि शासकीय संस्थेत आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमात किंवा खाजगी क्षेत्रातील उपक्रमात वित्त / लेखनामध्ये ०७ वर्षांचा अनुभव किंवा पदवीधर आणि CA / CMA इंटरमिडिएट परीक्षेत उत्तीर्ण आणि शासकीय संस्थेत आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमात किंवा खाजगी क्षेत्रातील उपक्रमात वित्त / लेखनामध्ये ०५ वर्षांचा अनुभव.

वयोमर्यादा :- जास्तीत जास्त ४५ वर्षे

वेतनमान :- दर महिना रुपये ५५,३८४/-

अनुप्रयोग मोड :- ऑनलाइन

प्रवेश शुल्क :-

१) इतर :- रुपये ७००/-

२) SC / ST :- प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही.

प्रवेश अर्ज सुरू होण्याची तारीख :- ०४ ऑक्टोबर २०२४

प्रवेश अर्ज करण्याची अंतिम तारीख :- ३० ऑक्टोबर २०२४

Cochin Shipyard Limited Bharti 2024 :- उमेदवाराची पात्रता

  • SC / ST उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०५ वर्षे अधिक असेल.
  • OBC उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०३ वर्षे अधिक असेल.

Cochin Shipyard Limited Bharti 2024 :- संबंधित भरतीसाठी प्रवेश अर्ज कसा करावा ?

  • उमेदवाराने संबंधित भरतीची खाली नमूद केलेली जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावी.
  • उमेदवाराने संबंधित भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, महत्वाची कागदपत्रे इत्यादी बाबींची खात्री करूनच व्यवस्थित अर्ज भरावा.
  • प्रवेश अर्ज भरताना उमेदवाराने स्वतःचा चालू असलेला ईमेल आयडी तसेच मोबाइल नंबर प्रविष्ट करावा जेणेकरून भरतीबाबतचे पुढील सूचना मिळण्यास मदत होईल.
  • प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावा आणि मग त्यानंतर अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
  • प्रवेश अर्जासोबत उमेदवाराने त्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
  • प्रवेश अर्ज भरून झाल्यावर संबंधित भरतीसाठी लागणारे प्रवेश शुल्क भरणे उमेदवारासाठी बंधनकारक असेल.
  • अंतिम सबमिशन करण्यापूर्वी उमेदवाराने संपूर्ण प्रवेश अर्ज काळजीपूर्वक पडताळून घ्यावा.

Cochin Shipyard Limited Bharti 2024 :- इतर महत्वाच्या सूचना

  • संबंधित भरतीसंबंधित सर्व अधिकार हे कोचीन शिपयार्ड लिमिटेडकडे राखीव असतील.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे भारताचे नागरिकत्व असणे आवश्यक आहे.
  • भरतीसंबंधित कोणत्याही नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज नाकारण्यात येईल.
  • प्रवेश अर्जामध्ये कोणत्याही बाबींची त्रुटि आढळल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • संबंधित भरतीसंबंधित एकदा भरलेल्या अर्जामध्ये कोणत्याही प्रकारचे फेरबदल हे उमेदवारास करता येणार नाही.
  • एकदा भरलेले प्रवेश शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही.
  • उमेदवाराने प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्या अर्जाची एक प्रत काढून ठेवावी.
  • कागदपत्र पडताळणी ही ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.
  • कागदपत्र पडताळणीसाठी मूळ कागदपत्रे तसेच त्याच्या प्रती घेऊन जाणे आवश्यक आहे.
  • अधिक माहितीसाठी खाली दिलेले PDF डाऊनलोड करा.

Cochin Shipyard Limited Bharti 2024 :- प्रवेश अर्जासोबत आवश्यक असणारी महत्वाची कागदपत्रे

  • उमेदवाराचा सध्याचा पासपोर्ट साइज फोटो
  • उमेदवाराची सही
  • आवश्यक शैक्षणिक पात्रतेशी संबंधित कागदपत्रे (उत्तीर्ण प्रमाणपत्रे आणि गुणपत्रिका)
  • उमेदवाराचा जन्माचा दाखला (किंवा इयत्ता १०वी प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र)
  • SC / ST / OBC-NCL उमेदवाराचे जात प्रमाणपत्र
  • अपंगत्व प्रमाणपत्र
  • Ex-Servicemen उमेदवाराचे डिस्चार्ज प्रमाणपत्र
  • वैद्यकीय चाचणी किंवा वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र
  • अनुभव प्रमाणपत्र
  • इतर कोणतीही संबंधित मूळ कागदपत्रे आणि प्रत
OFFICIAL WEBSITE CLICK HERE
APPLY ONLINECLICK HERE
NOTIFICATION PDF CLICK HERE
Cochin Shipyard Limited Bharti 2024 :-
Cochin Shipyard Limited (CSL) offically announced 20 vacant post. Recruitment of "Assistant Engineer (Mechanical), Assistant Engineer (Electrical), Assistant Engineer (Electronics), Assistant Engineer (Maintenance), Assistant Administrative Officer, Assistant Fire Officer, Accountant" posts under Cochin Shipyard Limited (CSL). The last date of submission of application is 30th October 2024. Mode of Application is Online. Also the recruitment application form will be available from 04th October 2024 on given website. The information regarding how to apply as well as educational qualification, selection process, important documents are given below. The complete details of recruitment are given in the advertisement. Before applying for this recruitment read the advertisement carefully. For more information please visit our website Kamdhande.Com.


Total Number of posts :- 20 posts

Name of the Post :-
1) Assistant Engineer (Mechanical)
2) Assistant Engineer (Electrical)
3) Assistant Engineer (Electronics)
4) Assistant Engineer (Maintenance)
5) Assistant Administrative Officer
6) Assistant Fire Officer
7) Accountant

Education Qualifications :- Educational Qualifications is required as per the post. For more information download the PDF.

Age Limit :- Upper Age limit is 45 years old

Salary :- Rs. 55,384/- Per Month

Application Mode :- Online

Application Fees :-
1) Others :- Rs. 700/-
2) SC / ST Candidates :- No Application Fees Charged.

First date of submission of application :- 04th October 2024

Last date of submission of application :- 30th October 2024

Candidate's Eligibility :-
1) The age limit for SC / ST candidates will be 05 years more then the above age limit.
2) The age limit for OBC candidates will be 03 years more then the above age limit.

Important Documents :-
1) Candidate's latest Photograph
2) Candidate's Signature
3) Documents related to essential qualification (Passing Certificates and Mark sheets)
4) Documentary proof of Date of Birth (Matriculation/ 10th/ Date of Birth Certificate)
5) Valid Caste Certificate SC / ST / OBC-NCL Candidate
6) Disability Certificate
7) Medical Test Or Medical Fitness Certificate
8) Experience Certificate
9) Discharge Certificate of Ex-Servicemen
10) Any other relevant original documents and copies

नवनवीन भरतीशी संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा. तसेच या वेबसाइट मार्फत मिळणाऱ्या सर्व भरतींचे अपडेट्स तुमच्या मित्रांसोबत तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच येणाऱ्या इतर नवनवीन भरतींचे विनामूल्य अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Kamdhande.Com या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा.