मुदतवाढ, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडमध्ये ८७५ नवीन पदांसाठी भरती जाहीर

Mahavitaran Recruitment 2024

Mahavitaran Recruitment 2024 :- महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडमध्ये ८७५ नवीन पदांची भरती जाहीर झालेली आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत “कनिष्ठ सहाय्यक (लेखा), पदवीधर शिकाऊ अभियंता (वितरण / स्थापत्य), पदवीधारक शिकाऊ अभियंता (वितरण / स्थापत्य)” ह्या पदासाठी भरती केली जाणार आहे. प्रवेश अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ही १६ ऑगस्ट २०२४ ही आहे. संबंधित भरती ही ऑनलाइन पद्धतीने केली जात आहे. तसेच संबंधित भरतीचे प्रवेश अर्ज दिनांक १ मार्च २०२४ पासून खाली नमूद केलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले होते. दिनांक ०९ ऑगस्ट २०२४ पासून ही अर्ज प्रक्रिया पुन्हा उमेदवारांसाठी चालू केलेली आहे. इच्छुक उमेदवारांना भरतीसाठी अर्ज कसा करावा तसेच त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, महत्वाची कागदपत्रे हयाबद्दल संपूर्ण माहिती दिली जाते. संबंधित भरतीची संपूर्ण माहिती जाहिरातीत दिलेली आहे. अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधित जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचावी. तसेच ह्या भरतीबाबत पुढील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी Kamdhande.Com ह्या संकेतस्थळाला भेट द्या.

Mahavitaran Recruitment 2024

एकूण पदांची संख्या :- ८७५ पदे

पदाचे नाव :-

पद क्र. १ :- कनिष्ठ सहाय्यक (लेखा) – ४६८ पदे

पद क्र. २ :- पदवीधर शिकाऊ अभियंता (वितरण / स्थापत्य) – ३२१ पदे

पद क्र. ३ :- पदवीधारक शिकाऊ अभियंता (वितरण / स्थापत्य) – ८६ पदे

शैक्षणिक पात्रता :-

पद क्र. १ :- B.COM / BMS / BBA + MSCIT किंवा समतुल्य

पद क्र. २ :- इलेक्ट्रिकल / सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी

पद क्र. ३ :- इलेक्ट्रिकल / सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा

वयोमर्यादा :-

पद क्र. १ :- कनिष्ठ सहाय्यक (लेखा) – जास्तीत जास्त ३० वर्षे

पद क्र. २ :- पदवीधर शिकाऊ अभियंता (वितरण / स्थापत्य) – जास्तीत जास्त ३५ वर्षे

पद क्र. ३ :- पदवीधारक शिकाऊ अभियंता (वितरण / स्थापत्य) – जास्तीत जास्त ३० वर्षे

वेतनमान :-

पद क्र. १ :- कनिष्ठ सहाय्यक (लेखा) :-

१) प्रथम वर्ष :- प्रती महिना रुपये १९,०००/-

२) द्वितीय वर्ष :- प्रती महिना रुपये २०,०००/-

३) तृतीय वर्ष :- प्रती महिना रुपये २१,०००/-

पद क्र. २ :- पदवीधर शिकाऊ अभियंता (वितरण / स्थापत्य) :- प्रती महिना रुपये २२,०००/-

पद क्र. ३ :- पदवीधारक शिकाऊ अभियंता (वितरण / स्थापत्य) :- प्रती महिना रुपये १८,०००/-

अनुप्रयोग मोड :- ऑनलाइन

प्रवेश शुल्क :-

१) खुला प्रवर्ग :- रुपये ५००/- + GST

२) राखीव प्रवर्ग / अनाथ :- २५०/- + GST

प्रवेश अर्ज सुरू होण्याची तारीख :- ०१ मार्च २०२४

प्रवेश अर्ज पुन्हा सुरू होण्याची तारीख :- ०९ ऑगस्ट २०२४

प्रवेश अर्ज करण्याची अंतिम तारीख :- १६ ऑगस्ट २०२४

Mahavitaran Recruitment 2024 :- उमेदवाराची पात्रता

  • मागासवर्गीय तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांसाठी साठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०५ वर्षे अधिक असेल.
  • PwBD उमेदवारांकरिता कमाल वयोमर्यादा ४५ वर्षांपर्यंत शिथिलक्षम राहील.
  • माजी सैनिकांकरिता कमाल वयोमर्यादा ४५ वर्षांपर्यंत शिथिलक्षम राहील.
  • महावितरण कंपनीमधील पात्र कर्मचाऱ्यांसाठी कमाल वयोमर्यादा ५७ वर्षांपर्यंत शिथिलक्षम राहील..
  • खेळाडूंसाठी सेवाप्रवेशातील नियमानुसार विहित असलेल्या वयोमर्यादेत ०५ वर्षांपर्यंत वयाची अट शिथिल राहील.
  • अनाथ आरक्षणासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास कमाल वयोमर्यादा ०५ वर्षे शिथिलक्षम राहील.
  • एखादा उमेदवार वयोमर्यादेतील सवलतीपैकी एकापेक्षा जास्त सवलतीकरीता पात्र ठरत असल्यास पात्र सवलतीपैकी अधिकत्तम वयाची सवलत अनुज्ञेय राहील.

Mahavitaran Recruitment 2024 :- संबंधित भरतीसाठी प्रवेश अर्ज कसा करावा ?

  • उमेदवाराने संबंधित भरतीची खाली नमूद केलेली जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावी.
  • उमेदवाराने संबंधित भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, महत्वाची कागदपत्रे इत्यादी बाबींची खात्री करूनच व्यवस्थित अर्ज भरावा.
  • प्रवेश अर्ज भरताना उमेदवाराने स्वतःचा चालू असलेला ईमेल आयडी तसेच मोबाइल नंबर प्रविष्ट करावा जेणेकरून भरतीबाबतचे पुढील सूचना मिळण्यास मदत होईल.
  • प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावा आणि मग त्यानंतर अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
  • प्रवेश अर्जासोबत उमेदवाराने त्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
  • प्रवेश अर्ज भरून झाल्यावर संबंधित भरतीसाठी लागणारे प्रवेश शुल्क भरणे उमेदवारासाठी बंधनकारक असेल.
  • अंतिम सबमिशन करण्यापूर्वी उमेदवाराने संपूर्ण प्रवेश अर्ज काळजीपूर्वक पडताळून घ्यावा.

Mahavitaran Recruitment 2024 :- इतर महत्वाच्या सूचना

  • संबंधित भरतीसंबंधित सर्व अधिकार हे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडकडे राखीव असतील.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे भारताचे नागरिकत्व असणे आवश्यक आहे.
  • भरतीसंबंधित कोणत्याही नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज नाकारण्यात येईल.
  • प्रवेश अर्जामध्ये कोणत्याही बाबींची त्रुटि आढळल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • संबंधित भरतीसंबंधित एकदा भरलेल्या अर्जामध्ये कोणत्याही प्रकारचे फेरबदल हे उमेदवारास करता येणार नाही.
  • एकदा भरलेले प्रवेश शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही.
  • उमेदवाराने प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्या अर्जाची एक प्रत काढून ठेवावी.
  • कागदपत्र पडताळणी ही ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.
  • कागदपत्र पडताळणीसाठी मूळ कागदपत्रे तसेच त्याच्या प्रती घेऊन जाणे आवश्यक आहे.
  • अधिक माहितीसाठी खाली दिलेले PDF डाऊनलोड करा.

Mahavitaran Recruitment 2024 :- प्रवेश अर्जासोबत आवश्यक असणारी महत्वाची कागदपत्रे

  • उमेदवाराचा सध्याचा पासपोर्ट साइज फोटो (४.५ सेमी * ३.५ सेमी) डायमेन्शन (२००*२३० पिक्सेल) (२० KB*५० KB)
  • उमेदवाराची सही (पांढऱ्या कागदावर काळ्या रंगाच्या शाईने केलेली असावी) डायमेन्शन (१४०*६०) (१० KB*२० KB)
  • उमेदवाराचा डाव्या अंगठ्याचा ठसा (पांढऱ्या कागदावर काळ्या किंवा निळ्या रंगाच्या शाईने केलेला असावा) डायमेन्शन (१४०*६० पिक्सेल) (२० KB*५० KB)
  • उमेदवाराची घोषणा (पांढऱ्या कागदावर काळ्या रंगाच्या शाईने केलेली असावी) डायमेन्शन (१४०*६० पिक्सेल) (५० KB*१०० KB)
OFFICIAL WEBSITE CLICK HERE
APPLY ONLINECLICK HERE
NOTIFICATION PDF Post No. 1

Post No. 2

Post No. 3
REOPEN NOTIFICATIONCLICK HERE
Mahavitaran Recruitment 2024 :-
Maharashtra State Electricity Distribution Company Limited announced 875 vacant post. Recruitment of "Junior Assistant (Accounts), Graduate Engineer Trainee (Distribution / Civil), Diploma Engineer Trainee (Distribution / Civil)" posts under Maharashtra State Electricity Distribution Company Limited. The last date of submission of application is 16th August 2024. Mode of Application is Online. Also the recruitment application form were made available from 01st March 2024 on given website. The application process is reopened for the candidates from 09th August 2024. The information regarding how to apply as well as educational qualification, selection process, age limit, important documents are given below. The complete details of recruitment are given in the advertisement. Before applying for this recruitment read the advertisement carefully. For more information please visit our website Kamdhande.Com

Total Number of posts :- 875 posts

Name of the post :-
Post No. 1 :- Junior Assistant (Accounts) - 468 posts
Post No. 2 :- Graduate Engineer Trainee (Distribution / Civil) - 321 posts
Post No. 3 :- Diploma Engineer Trainee (Distribution / Civil) - 86 posts

Educational Qualification :-
Post No. 1 :- B.Com / BMS / BBA with MSCIT or its equivalent
Post No. 2 :- Degree in Electrical / Civil Engineering
Post No. 3 :- Diploma in Electrical / Civil Engineering

Age Limit :-
Post No. 1 :- Junior Assistant (Accounts) - Up to 30 years old
Post No. 2 :- Graduate Engineer Trainee (Distribution / Civil) - Up to 35 years old
Post No. 3 :- Diploma Engineer Trainee (Distribution / Civil) - Up to 30 years old

Salary :-
Post No. 1 :- Junior Assistant (Accounts) :-
1) First Year :- Per month Rs. 19,000/-
2) Second Year :- Per month Rs. 20,000/-
3) Third Year :- Per month Rs. 21,000/-

Post No. 2 :- Graduate Engineer Trainee (Distribution / Civil) :- Per month Rs. 22,000/-

Post No. 3 :- Diploma Engineer Trainee (Distribution / Civil) :- Per month Rs. 18,000/-

Application Mode :- Online

Application Fees :-
1) Open Category / Applied against open category :- Rs. 500/- + GST
2) Reserved Category / Orphan :- 250/- + GST

First date of submission of application :- 01st March 2024

Reopen date of submission of application :- 09th August 2024

Last date of submission of application :- 16th August 2024

Candidate's Eligibility :-
1) The age limit for candidates belonging to backward class and economically weaker section will be 05 years more then the above age limit.
2) Upper age limit will be relaxed up to 45 years for PwBD Candidates.
3) Upper age limit will be relaxed up to 45 years for Ex-Servicemen.
4) Upper age limit will be relaxed up to 57 years for eligible employees in Mahavitran Company.
5) The age limit for Sports person will be 05 years more then the above age limit.
6) The age limit for Orphan candidates will be 05 years more then the above age limit.
7) If a candidate qualifies for more than one of the age relaxations then the maximum age relaxation among the eligible relaxations shall be admissible.

Important documents :-
1) Candidate's passport size photo (4.5cm*3.5cm) Dimension (200*230 Pixel) (20KB*50KB)
2) Candidate's signature (White paper with Black ink) Dimension (140*60 Pixel) (10KB*20KB)
3) Left hand thumb impression (White paper with Black or Blue ink) Dimension (140*60 Pixel) (20KB*50KB)
4) Candidate's Declaration (White paper with Black ink) Dimension (140*60 Pixel) (50KB*100KB)

नवनवीन भरतीशी संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा. तसेच या वेबसाइट मार्फत मिळणाऱ्या सर्व भरतींचे अपडेट्स तुमच्या मित्रांसोबत तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच येणाऱ्या इतर नवनवीन भरतींचे विनामूल्य अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Kamdhande.Com या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा.